chessbase india logo

भाऊसाहेब पडसलगीकर बुध्दिबळ महोत्सव २०२५

by Vivek Sohani - 04/05/2025

कै. भाऊसाहेब यांनी स्थापन केलेल्या नूतन बुध्दिबळ मंडळातर्फे गेली ५६ वर्षे भरत असलेल्या स्पर्धा या वर्षीही सांगली आणि बुध्दिबळ हे जुने समीकरण घेऊन येत आहेत. मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष मा.सोहन शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ८, १०, १२, १४, १६ या वयोगटातील स्पर्धा तसेच रॅपिड व टिम चॅम्पियनशिप, महिलांसाठी कै. सौ. मीनाताई शिरगांवकर खुली रॅपिड व खुल्या गटासाठी आदरणीय कै. बाबूकाका शिरगांवकर स्मृती फिडे रेटिंग स्पर्धा अशा ११ विविध स्पर्धा त्याचप्रमाणे बुध्दिबळ प्रशिक्षण असा हा महोत्सव सांगली शिक्षण संस्थेच्या डॉ. बापट बाल शिक्षणमंदिरात दि. २७ एप्रिल ते ८ जून अखेर चालणार आहे.

कै. भाऊसाहेब पडसलगीकर - भारतातील हाताच्या बोटावर मोजता येतील अश्या जुन्या जाणत्या आयोजकांपैकी एक!

सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व दक्षिण भारतात बुद्धिबळाचा पाया रचणारे एक नामांकित व्यक्तिमत्त्व म्हणजे भाऊसाहेब पडसलगीकर. त्यांच्या कार्यकाळात असंख्य स्पर्धांचे अत्यंत शिस्तबद्ध आयोजन त्यांनी केलं. त्यांनी केवळ स्पर्धा आयोजित केल्या नाहीत, तर बुद्धिबळ संस्कृती रुजवली. त्यांच्या कार्यामुळे सांगली जिल्हा आजही भारतीय बुद्धिबळ नकाशावर उठून दिसतो. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिलं. त्यांचा सुसंगत विचार, संयम आणि कटाक्षाने शिस्त पाळण्याची वृत्ती उल्लेखनीय होती. त्यांच्या नावाने आजही बुद्धिबळ स्पर्धा घेतल्या जातात – हीच खरी बुद्धिबळ भिश्माचार्यास आदरांजली!

बुद्धिबळ महर्षी कै. भाऊसाहेब पडसलगीकर बुद्धिबळ महोत्सवांतर्गत होत असलेल्या स्पर्धा खालीलप्रमाणे –

१) कै. मेजर एन. डी. नवले स्मृती बेसिक बुध्दिबळ प्रशिक्षणवर्ग

दि. २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२५, प्रवेश फी ₹३००/- सकाळी ९ ते ११ वाजता.
प्रशिक्षण वर्गात मा. अँड. किरण नवले, डॉ. विजय कुरडे व प्रा. सौ. विद्या कुरडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

२) ४ थी कै. गुंडाप्पा कांते स्मृती ऑल इंडिया खुली रॅपिड बुध्दिबळ स्पर्धा

दि. २७ एप्रिल २०२५, प्रवेश फी ₹३००/- स्पॉट ₹४००/-
एकूण पारितोषिके ₹१५,०००/- प्रथम पारितोषिक ₹४,०००/- + ट्रॉफी
८, १०, १२, १४ वयोगट व महिलांसाठी प्रत्येकी २ चषक. पारितोषिके गुंडाप्पा कांते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने.

३) ३ री कै. काकासाहेब चितळे स्मृती ऑल इंडिया टिम बुध्दिबळ स्पर्धा

दि. १ मे २०२५, टिम प्रवेश फी ₹५००/-
एकूण पारितोषिके ₹३०,०००/-
प्रथम ₹५,०००/-, दुसरे ₹३,०००/-, तिसरे ₹२,०००/-
चितळे डेअरी, भिलवडी यांच्यावतीने.

४) ४५ वी कै. तम्माण्णाचार्य पडसलगीकर स्मृती ८ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा

दि. ३ मे २०२५, सकाळी ९:३० वा., पात्रता – ०१/०१/२०१७ नंतर जन्म
प्रवेश फी ₹३००/- स्पॉट ₹४००/-, प्रथम पारितोषिक ₹३,०००/-
ट्रॉफी – पुरोहित चेस अकॅडेमी व पडसलगीकर कुटुंबीय.

५) १७ वी कै. श्रीमंत बाळासाहेब लागू स्मृती ऑल इंडिया खुली रॅपिड बुध्दिबळ स्पर्धा

दि. ४ मे २०२५, प्रवेश फी ₹३००/- स्पॉट ₹४००/-
१० मि. + ५ सेकंद वेळ, एकूण पारितोषिके ₹२५,०००/-
प्रथम पारितोषिक ₹५,०००/-
वयोगटासाठी प्रत्येकी २ चषक, पारितोषिके – कुमार लागू, पुणे.

६) ३० वी कै. सौ. लिलाताई रा. देशपांडे स्मृती १० वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा

दि. ६ मे २०२५, पात्रता – ०१/०१/२०१५ नंतर जन्म
प्रवेश फी ₹३००/- स्पॉट ₹४००/- प्रथम पारितोषिक ₹३,०००/-
ट्रॉफी – पुरोहित चेस अॅकॅडमी
पारितोषिके – आर. आर. देशपांडे, पुणे.

७) ३२ वी कै. आबासाहेब गानू (वकील) स्मृती १२ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा

दि. ८ मे २०२५, पात्रता – ०१/०१/२०१३ नंतर जन्म
प्रवेश फी ₹३००/- स्पॉट ₹४००/- प्रथम पारितोषिक ₹३,०००/-
पारितोषिके – प्रमोद गानू यांच्यावतीने.

८) ३० वी कै. सौ. सीताबाई रा. भिडे स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा

दि. १० मे २०२५, पात्रता – ०१/०१/२०११ नंतर जन्म
प्रवेश फी ₹३००/- स्पॉट ₹४००/- प्रथम पारितोषिक ₹३,०००/-
ट्रॉफी – पुरोहित चेस अॅकॅडमी
पारितोषिके – भिडे कुटुंबीय.

९) ४७ वी कै. श्रीमंत दादासाहेब गाडगीळ सराफ स्मृती १६ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा

दि. ११ मे २०२५, पात्रता – ०१/०१/२००९ नंतर जन्म
प्रवेश फी ₹३००/- स्पॉट ₹४००/- प्रथम पारितोषिक ₹३,०००/-
पारितोषिके – पु. ना. गाडगीळ सराफ यांच्यावतीने.

१०) १९ वी कै. सौ. मीनाताई शिरगांवकर स्मृती खुली महिला बुध्दिबळ स्पर्धा

दि. १२ मे २०२५ सकाळी ९:०० वा.
प्रवेश फी – मोफत
एकूण पारितोषिक ₹१,००,०००/-
प्रथम पारितोषिक ₹१७,०००/-
८८ पारितोषिके, विविध वयोगटातील चषक. पारितोषिके – शिरगांवकर कुटुंबीय.

११) कै. विवेक वसंतराव पुरोहित स्मृती ऑल इंडिया खुली रॅपिड बुध्दिबळ स्पर्धा

दि. १८ मे २०२५, प्रवेश फी ₹३००/- स्पॉट ₹४००/-
एकूण पारितोषिके ₹१५,०००/-, प्रथम पारितोषिक ₹३,०००/- + ट्रॉफी
वयोगटासाठी ₹५००/- + ट्रॉफी
पारितोषिके – पुरोहित चेस अॅकॅडमी.

१२) ३ री कै. भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती अखिल भारतीय रॅपिड बुध्दिबळ स्पर्धा

दि. २४ मे २०२५ सकाळी १० वा., वेळ – १० मि. + ५ सेकंद
प्रवेश फी ₹३००/- स्पॉट ₹४००/-
प्रथम पारितोषिक ₹५,०००/-, एकूण २५ पारितोषिके, विविध वयोगटासाठी चषक
पारितोषिके – प्रा. रामकृष्ण आराणके यांच्यावतीने.

१३) १४ वी कै. नारायणराव जोशी स्मृती अखिल भारतीय रॅपिड बुध्दिबळ स्पर्धा

दि. २५ मे २०२५ सकाळी १० वा., वेळ – १० मि. + ५ सेकंद
प्रवेश फी ₹४००/- स्पॉट ₹५००/-
एकूण पारितोषिके ₹४०,०००/-, प्रथम ₹८,०००/-
विविध वयोगट व महिलांसाठी चषक
पारितोषिके – अविनाश वळवडे (पुणे), सुलभा हर्डीकर (अमेरिका).

१४) ५६ वी कै. बाबूकाका शिरगांवकर फिडे मानांकन खुली बुध्दिबळ स्पर्धा – ५६ वे वर्ष

दि. ८ जून २०२५, प्रवेश फी ₹१,०००/-
एकूण पारितोषिके ₹२,००,०००/-
प्रथम पारितोषिक ₹२०,००१/-, १११ पारितोषिके
पारितोषिके – शिरगांवकर कुटुंब (दि. उगार शुगर वॅक्स लि.)

संपर्क:

  • सचिव श्री. चिंतामणी लिमये – मो. ९४२२०४२०२२

  • फिडे पंच दीपक वायचळ – मो. ९४२३८७२९२४


Contact Us